'त्या' सहायक निबंधकासह वरिष्ठ लिपिकाला दोन दिवसांची पोलीस कोठडी

FIR
FIR

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकमध्ये तालुका सहायक निबंधकच (Registrar) तब्बल २० लाखाची लाच घेताना एसीबीच्या पथकाला रंगेहाथ सापडला आहे. यात तालुका निबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपीकाचाही सहभाग आहे.

त्यामुळे सहायक निबंधकासह वरिष्ठ लिपिकाला एसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, दोघांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ( Court) दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

एसीबीने (ACB) दिलेल्या माहितीनुसार, रणजीत महादेव पाटील (Ranjit Mahadev Patil) (वय-32 वर्ष, पद- सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, नेमणूक-सहकारी संस्था निफाड, अतिरिक्त कार्यभार सिन्नर) व प्रदीप अर्जुन वीरनारायण (Pradeep Arjun Veeranarayan) (वय-45 वर्षे, पद- वरिष्ठ लिपिक निफाड, कार्यालय-सहाय्यक निबंधक सहकारी संस्था निफाड वर्ग 3) यांनी सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडून २० लाख रुपयांची लाच मागितली होती.

FIR
मोगरे खून प्रकरण : संशयित हरियाणातून ताब्यात; एक अद्याप फरार

यासंदर्भात एसीबीकडे तक्रार आली होती. त्यानंतर एसीबीच्या अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर (ACB Superintendent Sharmistha Valawalkar) यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या पथकाने सापळा रचून बुधवारी रात्री उशिरा (दि. 29) 20 लाख रुपये लाचेची रक्कम मुंबई नाका येथे तक्रारदार यांच्याकडून स्वीकारली असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

त्यानंतर एसीबीच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांच्यासह अँन्टी करप्शन ब्युरोचे (Anti-Corruption Bureau) पो.ना. प्रवीण महाजन, नितीन कराड, प्रभाकर गवळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com