शासकीय औद्योगिक प्रशिक्षण (महिला) संस्था
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण (महिला) संस्था

मुलींनो..! आयटीआय प्रवेश घेतलात का?

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण (महिला) संस्थेचे आवाहन

नाशिक | Nashik

२०२०-२०२१ शैक्षणिक वर्षाकरिता औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची या शासकीय संस्थेची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. परंतु प्रवेशप्रक्रियेसाठी...

करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रवेश घेण्याची मुदत राज्य शासनाने ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविली असून महिलांच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत डिजिटल फोटोग्राफी हा राज्यातील आयटीआय स्तरावरील महत्वाचा कोर्स तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर आणि पेंटर जनरल यासह रोजगार देणारे विविध एक आणि दोन वर्षाचे मुदतीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

या सर्व व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी दहावी पास ही शैक्षणिक पात्रता आवश्यक असून वयाची फारशी अट नाही मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकांना फीमध्ये मोठी सवलत उपलब्ध आहे संस्थेचे अद्यावत होस्टेल उपलब्ध आहे.

अभ्यासक्रमाचे शासकीय प्रमाणपत्र शासकीय योजनेतून व्यवसायासाठी कर्ज प्राप्त होण्यासाठी उपयुक्त ठरते. संस्थेमार्फत देखील प्रशिक्षणार्थींना रोजगार उपलब्ध होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात.

रोजगारासाठी इच्छुक महिलांनी त्वरित www.admission.dvet.gov.in या संकेत स्थळाला ३१ ऑगस्टपर्यंत संपर्क करावा अधिक माहिती करता 02532313514 या नंबरला संपर्क करावा असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com