फाळके स्मारक पुनरूज्जीवन योजनेसाठी दोन कंपन्या पात्र

फाळके स्मारक पुनरूज्जीवन योजनेसाठी दोन कंपन्या पात्र

नाशिक । प्रतिनिधी Nashik

चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाच्या पुनरुज्जीवनाची Revival of Dadasaheb Phalke Smarak योजना महापालिकेने NMC आखली असून त्यासाठी पीपीपी तत्त्वावर काढलेल्या स्वारस्य देकारात ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक नितीन देसाई यांची एनडी स्टुडिओ आणि मंत्रा एक्सपोर्ट या दोन कंपन्या पात्र ठरल्या आहेत.

या दोन्ही कंपन्यांना येत्या 6 डिसेंबरपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निर्देश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत. स्मारकाच्या पुनरुज्जीवनासाठी 89 कोटींचा खर्च अपेक्षित असून पात्र कंपनीसमवेत स्मारकासाठी 25 वर्षांचा करार केला जाणार आहे.

फाळके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1998 मध्ये पांडवलेणीच्या पायथ्याशी 29 एकर जागेवर भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. ओपन थिएटर, उद्यान, कॅफेटेरिया, दादासाहेबांनी हाताळलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आदी स्मारकाची वैशिष्ट्ये होती. परंतु कालांतराने स्मारकातील प्रत्येक सेवेचे खासगीकरण झाल्यानंतर प्रकल्पाची वाताहात झाली. मुंबईच्या फिल्मसिटीच्या धर्तीवर या स्मारकाचा विकास करण्याची योजना आयुक्त जाधव यांनी आखली आहे.

त्यासाठी पीपीपी तत्त्वावर स्मारक विकसित करण्यासाठी स्वारस्य देकार मागवण्यात आले होते. एनडी स्टुडिओचे नितीन देसाई यांच्यासह मुंबईच्या मंत्रा एक्सपोर्ट प्रा. लिमिटेड यांनी स्मारक चालवण्यासाठी आपली तयारी दर्शवली आहे. या कंपन्यांनी काही दिवसांपूर्वी आयुक्तांसमोर प्राथमिक प्रस्तावाचे सादरीकरण केल्यानंतर आयुक्तांनी या दोन्ही कंपन्यांना 6 डिसेंबरपर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com