रेल्वेगाडी खाली उडी घेत दोघांची आत्महत्या

रेल्वेगाडी खाली उडी घेत दोघांची आत्महत्या

नाशिकरोड | Nashik

नाशिकरोड (Nashikroad) ते ओढा या रेल्वे लाईन (Railway Line) दरम्यान नाशिकरोड वरून मनमाडकडे जाणाऱ्या एका रेल्वे गाडी खाली आत्या व भाच्याने आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्या का केली याबाबतचे निश्चित कारण समजू शकले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी (Nashikroad Police) आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव शोभा गंगाधर गोराडे (५१, रा. जेलरोड) व तिचा भाचा रोशन बाळासाहेब नरवडे राहणार पाथरे तालुका सिन्नर (Sinnar) असे दोघांचे नाव आहे. नाशिक रोड ते ओढा रेल्वे स्थानका दरम्यान मनमाडकडे (Manmad) जाणाऱ्या रेल्वे खाली आत्महत्या केली असून नाशिक रोड पासून डाऊन लाइन वरील किलोमीटर (क्रमांक १९२ । ०२ या ठिकाणी रेल्वे ट्रॅक वर या दोघांचे मृतदेह आढळून आले.

तसेच जवळच रेल्वे लाईन च्या बाजूला रस्त्यावर (एमएच १५ एफवाय ५३५८) या क्रमांकाची दुचाकी गाडी मिळाली गाडीच्या नंबर वरून पोलिसांनी तपास केला असता मृतदेहाची ओळख पटली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com