शैक्षणिक संस्थेविरुद्ध फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल

शैक्षणिक संस्थेविरुद्ध फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषदेस मान्यतेचे प्रस्ताव पाठवून तसेच शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी नियमबाह्य मान्यता देवून वेतनापोटी लाखो रुपयांच्या शासकीय निधीचा अपव्यय केल्याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोन शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, लिपीक आदींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

भद्रकाली पोलीस ठाण्यात दाखल दोन्ही गुन्हे पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. नाशिकरोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण उपनिरीक्षक डॉ. किरण जयप्रकाश कुंवर यांनी महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित माध्यमिक शाळेतील 65 तसेच आदिवासी सेवा समिती संचलित माध्यमिक शाळेतील 29 जणांविरुद्ध दोन गुन्हे नोंदवले आहेत.

शैक्षणिक संस्थेविरुद्ध फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल
देशदूत विशेष : मराठा आरक्षणाचा भाजपला फटका?

सदर दाखल केलेल्या गुन्ह्यातील संशयितांमध्ये तत्कालीन व विद्यमान संचालक मंडळ अध्यक्ष माजी मंत्री पुष्पाताई व्यंकटराव हिरे, उपाध्यक्ष पंडित दगा नेरे, कोषाध्यक्ष स्मिता प्रशांत हिरे, सेक्रेटरी प्रशांत व्यंकटराव हिरे, जॉइंट सेक्रेटरी दीपक रामराव सूर्यवंशी, सभासद डॉ. अपूर्व प्रशांत हिरे, अद्वय प्रशांत हिरे आदींचा समावेश आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिसांच्या माहितीनुसार, महात्मा गांधी विद्या मंदिर, नाशिक संचालित माध्यमिक शाळामधील 22 शिक्षक, 12 शिपाई व 6 लिपिक या कर्मचार्‍यांची संस्थेने केलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याने त्यांची चौकशी करुन शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करण्याबाबत पालकमंत्री दादा भुसे यांनी 17 जानेवारी 2023 रोजीच्या पत्रान्वये तक्रार केली होती. त्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांचे पत्र 2 फेब्रुवारी 2023 अन्वये चौकशीचे आदेश देण्यात आले होते.

शैक्षणिक संस्थेविरुद्ध फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल
बापरे! एक कोटीची लाच; एमआयडीसीचे दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com