भरदिवसा दोन ठिकाणी घरफोड्या; माहेरी आलेल्या मुलींचे दागिने लंपास

भरदिवसा दोन ठिकाणी घरफोड्या; माहेरी आलेल्या मुलींचे दागिने लंपास

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

तालुक्यातील नांदूरशिंगोटे (Nandoorshingote) येथील दरोड्याची घटना ताजी असतानाच दोडी खुर्द (Dodi Khurd) येथे भरदुपारी कोणी नसल्याचा फायदा घेत

घरफोडी (burglary) करुन 25 हजाराच्या रोख रकमेसह दागदागिने मिळून 3 लाखांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली. दिवाळीनिमित्त (diwali) माहेरी आलेल्या मुलींच्या पर्समधील दागिनेही (jewelry) चोरट्यांनी लंपास केले.

दोडी-दापूर रस्त्यावर दोड़ी खुर्द येथून एक किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन बंगल्यांमध्ये चोरट्यांनी (thieves) घरफोडी (burglary) केली. त्यापैकी एका ठिकाणी चोरट्यांनी हातसफाई तर दुसर्‍या ठिकाणी त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. साबळे मळा परिसरात प्रकाश महादू साबळे (50) यांचा बंगला आहे. घरातील सर्व सदस्य घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात कांदा लागवडीसाठी (Onion cultivation) गेले होते.

बंगला कुलूप बंद असल्याचे चोरट्यांच्या (thieves) निदर्शनास येताच त्यांनी कुलूप आणि कडी कोंयडा तोडून घरात प्रवेश मिळवला. कपाटातून 40 हजारांची दिवाळीसाठी माहेरी आलेल्या मुलीच्या पर्समधील दीड तोळ्यांचा नेकलेस, सोन्याची पोत, लहान बाळाच्या गळ्यातील ओम पान असा सुमारे 3 लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला. यानंतर प्रकाश साबळे व घरातील कामावर गेलेले सदस्य जेवणासाठी घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला.

यासंदर्भात त्यांनी नांदूरशिंगोटे पोलिसांना (police) माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. येथून एक किलोमीटर अंतरावर कैलास सगळे (37) यांनी नवीनच बंगला बांधला असून तेथे अजून कोणी राहत नाही. चोरट्यांनी या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मात्र, चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. काही अंतरावर असलेल्या जुन्या घरात सगळे व इतर सदस्य बसले होते. घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com