
सुरगाणा | प्रतिनिधी Surgana
दुपारी तीन वाजेच्या सुमारास वातावरणात बदल झाल्याने विजांच्या कडकडाटांसह अवकाळी पाऊस झाला.
शिवपाडा ता. सुरगाणा येथील शेतकरी चिंतामण वामन हाडस हे मांजरपाडा, राहुचे शिवारात शेतातील झापावर आपले बैल दावणीला बांधून अवघ्या काही मिनिटात तेथून घरी परतण्याचा वाटेवर असतांनाच दोन्ही बैलांवर विज कोसळल्याने दोन्ही बैल जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
शिवसेना तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे, शिदे गटाचे चिंतामण गायकवाड, यांनी तात्काळ तहसीलदार यांना माहिती दिली. यामुळे शेतक-याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
तलाठी रेखा मोरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. यावेळी पंडित ठाकरे, मोतीराम अहिरे, भाऊराव पिठे, कौतिक पिठे, विष्णू गांगुर्डे, भारत पिठे आदी उपस्थित होते.