गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

सिन्नर l Sinnar

येथील उज्ज्वलनगर परिसरात (Ujjwalnagar) गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) भीषण स्फोटात (Blast) तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी दोन सख्ख्या भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, मुसळगाव (Musalgaon) वसाहतीतील उज्ज्वलनगरमध्ये शनिवारी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात दीपराज देवराज साकेत (Deepraj Devraj Saket) (19) आणि कृष्णचंद्रा देवराज साकेत (Krishnachandra Devaraj Saket) (27, ह.मु. उज्ज्वलनगर, सिन्नर. मूळ रा. मध्यप्रदेश) या दोन भावंडांचा मृत्यू झाला आहे.

गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
अथक प्रयत्नाअंती बुडालेल्या युवकाचा मृतदेह हाती; 'पाहा' थक्क करणारा व्हिडीओ...

तर शुभम महादेव सोनवणे (Shubham Mahadev Sonawane) (14) हा गंभीर भाजला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात (Civil Hospital) उपचार सुरु आहे.

गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
Video : ...तर राऊतांना आमच्या शुभेच्छाच; भुजबळांनी सांगितला अनुभव

दरम्यान, साकेत बंधू मूळचे मध्यप्रदेशातील रहिवाशी होते. काही दिवसांपासून मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील (Musalgaon MIDC) एका कारखान्यात ते नोकरी करीत होते. तिघांपैकी एकाने चहा बनविण्यासाठी गॅस (Gas) पेटवला. मात्र तत्पूर्वीच गॅस गळती झालेली असल्याने गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला.

गॅस सिलेंडरच्या स्फोटात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
उद्धव ठाकरे गटाला 'सर्वोच्च' धक्का; 'ती' मागणी फेटाळली

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com