बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा बुडून मृत्यू

बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा बुडून मृत्यू

चांदवड | Chandwad

तालुक्यामधील पाटे शिवारात (Pate Shivar) बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे....

याबाबत अधिक माहिती की, संजय तळेकर (Sanjay Talekar) यांची दोन्ही मुले ओम (Om) आणि साहिल (Sahil) बकऱ्या चारण्यासाठी माळरानात गेले होते. दुपारी बारा ते सायंकाळपर्यंत हे दोघे दररोज बकऱ्या चारायला जात होते.

बुधवारी ते नेहमीप्रमाणेच माळरानावर गेले असता त्यांचा नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. यापैकी एकजण १३ वर्षांचा तर एक ११ वर्षांचा असल्याचे समजते. चांदवड पोलीस स्थानकाचे निरीक्षक समीर बारावरकर यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत जाऊन घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला.

ओम आणि साहिलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात (Chandwad Police Station) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास चांदवड पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मन्साराम बागुल, पोलीस हवालदार भावलाल हेंबाडे, प्रवीण थोरात करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com