लहान्याच्या व्यसनमुक्तीसाठी गेलेल्या दोघा भावंडांचा अपघाती मृत्यू

लहान्याच्या व्यसनमुक्तीसाठी गेलेल्या दोघा भावंडांचा अपघाती मृत्यू
अपघात

नवीन नाशिक | प्रतिनिधी Nashik

लहान भावाला व्यसनमुक्त करण्यासाठी घेऊन जाताना अपघात होऊन दोघा भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर ही घटना घडली....(accident on Mumbai-Agra highway)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख लक्ष्मण जाधव (वय ३५ ) व त्यांचा लहान भाऊ सोमनाथ लक्ष्मण जाधव (वय 25 ) हे दोघे राहणार ( मुरंबी, ता. इगतपुरी ) त्यांची दुचाकी ( एम एच १५ डी पी 4214 ) वरून सोमनाथचे मद्याचे व्यसन सोडण्याकरिता वणी येथे आज ( दि.१७ ) सकाळी गेले होते.

दरम्यान, वणीहुन (Vani Tal Dindori) परत येत असताना त्यांच्या दुचाकीला मुंबई आग्रा महामार्गावर पांडवलेणी (Accident near pandavleni nashik) समोर उड्डाण पुलावर अज्ञात वाहनाने धडक दिली. दरम्यान, या अपघातात दोन्ही भावांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. जाधव बंधूंच्या पश्चात आई, वडील, पत्नी दोन मुले, बहीण असा परिवार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com