
नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashik Road
सावकाराच्या (lender) जाचाला कंटाळून दोन सख्या भावांनी विषारी (Poisonous) औषध सेवन करून आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असून त्यापैकी एका भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने नाशिकरोड परिसरात खळबळ उडाली आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, रवींद्र लक्ष्मण कांबळे (३५) राहणार एकलहरे रोड व जगन्नाथ लक्ष्मण कांबळे (३९) राहणार जय भवानी रोड,नाशिकरोड हे दोघे सख्खे भाऊ एका खाजगी सावकाराकडे पैसे वसुलीसाठी कामाला होते. काही दिवसांपूवी काहीतरी कारणावरून सावकार आणि या दोन भावांमध्ये वाद (Dispute) झाला.
त्यानंतर काल (रविवार) पुन्हा वाद झाल्याने दोघा भावांनी एकलहरे येथील डोंगराजवळ विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघे भाऊ रस्त्याच्या (Road) एका बाजूला काही नागरिकांना बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यावेळी काही नागरिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी रवींद्र कांबळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू (Deth) झाला.
दरम्यान, या घटनेनंतर नातेवाईक व त्यांच्या मित्र परिवाराने रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला व संबंधित सावकारावर कारवाई करण्याचे मागणी केली. सदर घटनेप्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी (Nashik Road Police) अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.