दोन दुचाकीस्वारांवर बिबटयाचा हल्ला

दोन दुचाकीस्वारांवर बिबटयाचा हल्ला

विंचुरी दळवी | वार्ताहर

भगुर- पांढुर्ली रोडवर रात्री धावत्या मोटरसायकलवर बिबटयाने हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या दुचाकीस्वारांनी घटनास्थळावरून जीव वाचवत दवाखाना गाठला. यानंतर जखमींवर उपचार करून सोडून देण्यात आले...

अधिक माहिती अशी की, संजय खकाळे व मयुर दळवी भगूर कडून रात्री आठ वाजेच्या सुमारास विंचुर दळवीकडे जात होते.

दारणा नदीच्या पुढे निघाल्यानंतर झाडाझुडूपात दबा धरुन बसलेल्या बिबटयाने धावत्या दुचाकीवर हल्ला केला. दुचाकी चालवत असलेला मयुरच्या पायाला व मागे बसलेल्या संजय खकाळे यांच्या पाठीवर बिबट्याने पंजा मारला असून यामध्ये ते जखमी झाले.

यानंतर शेजारी वस्तीवर राहत असलेल्या शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्यावर बिबटयाने लगेच तेथून धुम ठोकली. त्यांना पांढुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले.

या परिसरात बिबटयाची दहशत कायम असल्यामुळे वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com