मनमाड : दीड हजाराची लाच घेताना शिपायास अटक

मनमाड : दीड हजाराची  लाच घेताना शिपायास अटक

मनमाड | Manmad

शहरातील तलाठी कार्यालयावर लाच लुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून शिपायाला दीड हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

या शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्या मध्ये खळबळ उडाली आहे.

या बाबत सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शहरातील एका तरुणाने वडिलांच्या निधना नंतर वारसाचे नाव लावण्यासाठी सर्व कागदोपत्राची पूर्तता केली होती, मात्र सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी या तरुणाकडे पैशांची मागणी करण्यात आली होती.

गेल्या काही महिन्या पासून हा तरुण तलाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवत होता मात्र जो पर्यंत पैसे देणार नाही तुझे काम होणार नाही असे उत्तर या तरुणाला मिळाल्या नंतर त्याने थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.

त्यानंतर एसीबीने तलाठी कार्यालया जवळ सापळा रचला. या सापळ्यात दीड हजार रुपयाची लाच घेतना शिपाई राजू पाटील अडकले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com