काळ्या बाजारात रेमडेसिवीर इंजेक्शन विकताना  दोघांना अटक

काळ्या बाजारात रेमडेसिवीर इंजेक्शन विकताना दोघांना अटक

नवीन नाशिक । प्रतिनिधी

सध्या नाशिक मध्ये अद्यापही रेमडेसिवीर चा तुटवडा जाणवत आहे अशातच अंबड पोलिसांनी सापळा रचुन दोन रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्या बाजारात विकणाऱ्यांना होंडा सिटी कार सह राणेनगर बोगदा येथे अटक केली आहे . न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राणेनगर बोगद्याजवळ शुक्रवारी मध्यरात्री दोन इसम दोन रेमडेसीविर इंजेक्शन काळ्या बाजारात ४८ हजार रुपयांना विकणार असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती . ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक सुरेश साहेबराव देशमुख यांना कळविले व सदर प्रकरणी छापा टाकण्यासाठी देशमुख यांनी अंबड पोलिसांनी बोलवून घेतले .

पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून त्यांनी इंजेक्शन देणाऱ्या इसमाला त्याच्या मोबाईलवर कॉल केला . बनावट गि - हाईकाने संशयितांच्या चारचाकी( एम एच ०४ ए वाय ३७५१ ) या होंडा सिटी कार मध्ये बसलेल्या व्यक्तींना पैसे देऊन इंजेक्शन मागितले . यात १ रेमडेसीविर ची मुऴ किमंत रु 3४९४ व दुसऱ्या रेमडेसीविर इंजेकशनची किमत रु ५४०० असुन त्यांनी या दोन्ही रेमडेसीविर इंजेक्शनची विक्री काळया बाजारात रुपये ४८ हजार रुपयांना विकत होते .

याच वेळी अंबड पोलिसांनी सापळा रचून अमोल रमेश देसाई ( वय ३६ , रा . विनयनगर , इंदिरानगर , नाशिक ) व निलेश सुरेश धामणे ( वय ४१ , रा . आसावरी चेंबर्स , कॉलेज रोड , नाशिक ) यांना ताब्यात घेऊन अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून चारचाकी कार , 2 इंजेक्शन व काही रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला . याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक सुरेश देशमुख यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात अत्याावश्यक सेवा वस्तु कायदा, भादवी कलम ४३४ / ४२० प्रमाणे

गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलिस आयुकत शोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राकेश शेवाळे करीत आहेत . पोलिसांनी संशयितांना शनिवारी न्यायालयात उभे केले असतांना न्यायालयाने त्यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. या संशयितांनी रेमडेसीविर कुठून आणले त्याची चौकशी पोलिस करित आहे.

अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात

या घटनेची माहिती वैभव देशमुख यांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार अंबड पोलीस ठाण्याचे बिटमार्शल अवघ्या काही वेळातच घटनास्थळी पोहोचलो व सदर संशयितांना सापळा रचुन रंगेहात पकडले मात्र त्यांना पोलिस ठाण्यात हजर केले असता पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली गेली असल्याचे देशमुख यांनी सांगितले. तर रात्री दोघा संशयितांना येथील अधिकाऱ्यांनी तुरुंगाच्या बाहेर काढत पोलीस ठाण्याच्या आवारात बसवून ठेवले होते.

हा सर्व प्रकार पोलीस ठाण्याच्या सी सी टिव्ही मध्ये कैद झाला आहे तसेच प्रत्यक्षदर्शीने सांगितले. त्यानंतर रात्री उशिराने हा गुन्हा दाखल झाला दरम्यान सदर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस टाळाटाळ करत असल्याने आप पक्षाचे जितेंद्र भावे यांनी अंबड पोलीस ठाण्यात येत फेसबुक लाइव्ह च्या माध्यमातून लोकांना सदर प्रकाराची माहिती दिली.

दरम्यान अंबड पोलीस वपोनी हे सुट्टीवर असल्याने त्यांचा पदभार दुसरे अधिकारी यांना देण्यात आला आहे. पोलीस ठाण्याच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यास सुरवातीला टाळाटाळ केली व नंतर रात्री उशिराने गुन्हा दाखल केल्याने पोलीस ठाण्याचे अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com