गावठी पिस्तुल विक्रीप्रकरणी दोघे अटकेत; कट्ट्यासह जिवंत काडतूस हस्तगत

गावठी पिस्तुल विक्रीप्रकरणी दोघे अटकेत; कट्ट्यासह जिवंत काडतूस हस्तगत

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

सिन्नर-शिर्डी महामार्गावर (Sinnar-Shirdi highway) मुसळगाव (musalgaon) वसाहत परिसरात गावठी पिस्तूल (pistol) व जिवंत काडतूस (live cartridge) विक्रीसाठी जवळ बाळगणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (Local Crime Squad) सापळा रचत अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil of Local Crime Branch) यांना मुसळगाव एमआयडीसी (Musalgaon MIDC) परिसरात गावठी पिस्तूल व काडतूस विक्री करण्यासाठी दोघे जात असल्याची गुप्त माहिती (confidential information) मिळाली होती.

त्यानुसार त्यांनी आपल्या पथकाला एमआयडीसी हॉटेल गुलमोहर समोर सापळा रचण्यास सांगितले. रात्री 8 वाजेच्या दरम्यान दोन तरुण सिन्नरहून (sinnar) शिर्डीकडे काळ्या-लाल रंगाच्या पल्सर मोटरसायकलवर जात असताना आढळून आले.

सदर तरुणांना थांबवून त्यांची चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. दोघांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ चंदेरी रंगाचे पिस्तूल (pistol) व एक जिवंत काडतुस मिळून आले. आतिफ शेख (23) व आयाज अहमद शेख (26) रा. दोघेही वैजापूर, जि. संभाजीनगर अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून गावठी पिस्तूल,

जिवंत काडतूस (live cartridge), दोन मोबाईल (mobile), एक मोटरसायकल (bike), एक पावती असा एकूण 1 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांची एमआयडीसी पोलीस ठाण्यात रवानगी करण्यात आली आहे. सदर कारवाईत गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे, पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे, हवालदार रविंद्र वानखेडे, नवनाथ सानप, विनोद टिळे, हेमंत गिलबिले, प्रदीप बहीरम यांनी भाग घेतला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com