सातपूर : विवाहिता आत्महत्या प्रकरणी दोघांना अटक
नाशिक

सातपूर : विवाहिता आत्महत्या प्रकरणी दोघांना अटक

सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

विवाहीतेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह दिरास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिंकू राकेश पाल (२८ रा.वरद विनायक सोसा.शनि चौक,श्रमिकनगर) या विवाहीतेने शनिवारी (दि.१८) आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब लक्षात येताच पती राकेश रामधनी पाल यांनी तिला तातडीने खासगी रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तिला मृत घोषीत केले.

याप्रकरणी विवाहीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या मंडळी कडून होणाजया छळास कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सातपूर पोलीसांनी पतीसह सासरच्या चार जणांविरूध्द गुन्हा दाखल केला असून पती आणि दिरास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक हेमंत नागरे करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com