पेठच्या सीमावर्ती भागात मध्यरात्री धरपकड; शिताफीने अवैध मद्यवाहतूक करणाऱ्यांना पकडले

पेठच्या सीमावर्ती भागात मध्यरात्री धरपकड; शिताफीने अवैध मद्यवाहतूक करणाऱ्यांना पकडले

पेठ | वार्ताहर Peth

गुजरात मधून नाशिक - पेठ मार्गाने (Gujrat Nashik peth highway) विदेशी दारूची तस्करी करणारे बलसाड (Walsad) जिल्हातील दोन संशयित आरोपींच्या (Two Suspects) विरोधात दारूबंदी सिमा तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या वाहनास धडक दिली. यानंतर या दोघांनी घटनास्थळावरून पोबारा केला...

याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या प्रयत्न व पोबारा केल्याप्रकरणी विभागाचे निरीक्षक मंगेश नारायणराव कावळे (Mangesh Kawale) यांच्या फिर्यादीवरून संशयित संजयभाई नाणूभाई पटेल रा . डुंगरी उदवाडा ता. पार्डी जि . बलसाड व किंजलभाई चंपकभाई पटेल रा . बेरीफलीया ता . वापी , जि . बलसाड यांचे विरुद्ध गुन्हा . रजि. क्र. ६२/ २०२२ भादवि कलम ३५३ , ३३२, ४२७ , ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोद करण्यात आली.

अधिक माहिती अशी की, गुजरात (Gujrat) मधून महाराष्ट्रात बेकायदेशिरपणे आरोपीचे वाहन महिंद्रा एक्सयुव्ही ५०० लाल रंगाची कार क्रमांक जीजे २१ एएच ९९९३ मध्ये पेठ मार्गे नाशिकला दारूची वाहतुकीची खबर प्राप्त झाली होती.

येथील करंजाळी (Karanjali) येथील राज्य उत्पादन शुल्क सिमा तपासणी नाक्याचे स्टाफला खबर मिळल्याने संशयित वाहन येताच त्यास थांबण्याची सुचना करूनही वाहन न थांबविता अंगावर गाडी घालूनसंशयित फरार झाले.

यावेळी या वाहनाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, उत्तम पोलिसिंग झाल्यामुळे वाहन पेठचे दिशेने आणतांना या घटनेची खबर पेठ पोलिसांना लागली. त्यानंतर त्यांनी सर्व मार्गावर बॅरीकेटस लावुन वाहन चालक व त्याचा साथीदारासह वाहन शिताफीने पकडले.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक दिवानसिंग वसावे (Police Inspector Diwansingh wasave) यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक कपिले अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.