गावठी पिस्तूल विक्रीप्रकरणी दोघांना बेड्या

गावठी पिस्तूल विक्रीप्रकरणी दोघांना बेड्या

सिन्नर | Sinner

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिन्नर-शिर्डी महामार्गावर मुसळगाव शिवारात गावठी पिस्तूल विक्री प्रकरणी दोघांना सापळा रचत अटक केली...

पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गावठी पिस्तुल विकण्याच्या उद्देशाने दोन जण मुसळगाव परिसरात येणार असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयुर भामरे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव शिरोळे, हवालदार रविंद्र खेडे, विनोद टिळे, नवनाथ सानप, हेमंत गिलबिले, प्रदीप बहीरम यांना आरोपींबाबत माहिती देत सापळा रचण्यास सांगितले.

गावठी पिस्तूल विक्रीप्रकरणी दोघांना बेड्या
Video : धकाधकीच्या जीवनात शांतता पाहिजे? सुरगाण्यातील 'या' ठिकाणी एकदा भेट द्याच

त्यानुसार मुसळगाव शिवारातील हॉटेल गुलमोहरजवळ सापळा रचण्यात आला. रात्री 8 च्या सुमारास दोन इसम काळया लाल रंगाच्या पल्सर मोटारसायकलवर सिन्नरकडुन शिर्डी बाजुकडे येतांना दिसल्यानंतर पथकाने त्यांना अडवत विचारपूस केली.

दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून चंदेरी रंगाचे 15 सेमी लांबीचे व 11 सेमी रुंदीचे गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतुस मिळून आली.

गावठी पिस्तूल विक्रीप्रकरणी दोघांना बेड्या
Big Breaking : लग्नाला विरोध, नाशिकच्या तरुण-तरुणीचे गोव्यात विषप्राशन; पुढे घडले असे काही...

याप्रकरणी आतिक रफिक शेख (23) व अंदाज आह शेख (26) दोघेही रा. वैजापुर जि. औरंगाबाद या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पिस्तूल, जिवंत काडतुस, मोटारसायकल, दोन मोबाईल असा 1 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com