मोटरसायकली चोरणाऱ्या दोघांना बेड्या; 'इतक्या' दुचाकी जप्त

मोटरसायकली चोरणाऱ्या दोघांना बेड्या; 'इतक्या' दुचाकी जप्त

नाशिकरोड | दिगंबर शहाणे | Nashik Road

गेल्या काही दिवसापासून नाशिक शहर व नाशिकरोड परिसरात दुचाकी (Bike) गाड्या चोरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्या असून या चोरांना आळा बसावा म्हणून शहर पोलिसांनी (City Police) मोटरसायकल चोरी प्रतिबंधक पथक याची स्थापना केली आहे...

मोटरसायकली चोरणाऱ्या दोघांना बेड्या; 'इतक्या' दुचाकी जप्त
Video : शेतकऱ्याने माळरानावर फुलविली थायलंड संशोधित पेरूची बाग

त्यानुसार नाशिक रोड गुन्हे शोध पथक (Nashik Road Crime Investigation Squad) व मोटरसायकल चोरी प्रतिबंधक पथक यांच्या संयुक्त मोहिमेला यश येऊन मोटरसायकली (Motorcycle)चोरणाऱ्या दोघांना अटक (Arrested) करण्यात आली असून त्यांच्याकडून तीन लाख ६५ हजार रुपये किमतीच्या ११ मोटर सायकल जप्त (Seized) करण्यात आल्या आहेत.

मोटरसायकली चोरणाऱ्या दोघांना बेड्या; 'इतक्या' दुचाकी जप्त
Video : वयोवृद्धांसाठी 'ते' दाम्पत्य बनलं आधारवड; पाहा देशदूतचा खास ग्राऊंड रिपोर्ट

याबाबत मोटरसायकल चोरी प्रतिबंध पथकातील पोलीस नाईक विशाल पाटील, मनोहर शिंदे, स्वप्निल जुंद्रे यांना मोटरसायकली चोरणाऱ्या दोघा संशयिताबाबत माहिती मिळाली असता त्यांनी संशयित आरोपी अनिकेत उर्फ सनी नंदराज अहिरे (रा. शरणपूर रोड, नाशिक) व संदीप नामदेव पवार (रा. मोरवाडी, सिडको, नाशिक) या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी नाशिक शहर व नाशिक रोड परिसरात सुमारे ११ मोटरसायकली चोरी केल्याचे कबूल केले.

या सर्व मोटरसायकली त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या आहे. गेल्या जुलै महिन्यापासून या पथकाने आत्तापर्यंत दोन विधी संघर्षित बालक व १९ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून २६ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या ८० मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.

मोटरसायकली चोरणाऱ्या दोघांना बेड्या; 'इतक्या' दुचाकी जप्त
Video : नैसर्गिक आपत्तीनं सारं हिरावून नेलं; कंबर कसली अन् उभारला 'हा' व्यवसाय

दरम्यान, या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Commissioner of Police Jayant Naiknavare) सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश नायदे, राजू पाचोरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील तसेच अविनाश देवरे, केतन कोकाटे, विनोद लखन, विशाल पाटील, मनोहर शिंदे, अजय देशमुख, स्वप्निल जुंद्रे, मुश्रीफ शेख, सचिन रामराजे आदींचे अभिनंदन केले आहे.

मोटरसायकली चोरणाऱ्या दोघांना बेड्या; 'इतक्या' दुचाकी जप्त
धोडप किल्ल्यावर जाताय? आधी 'हा' व्हिडीओ एकदा पाहाच...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com