२७ लाखाचा मद्यसाठा पळवणारे दोघे जेरबंद

नाशिकरोड दरोडा प्रकरण, गुन्हे शाखांची विशेष कामगिरी
२७ लाखाचा मद्यसाठा पळवणारे दोघे जेरबंद

नाशिक | Nashik

कंपनीच्या गुदामवर दरोडाटाकून 27 लाख रुपयांचा मद्यसाठा चोरणार्‍या आंतरराज्य टोळीतील दोघांना गुन्हे शाखा युनिट 1 व 2 च्या पथकाने जेरबंद केले आहे. यंशयितांकडून 20 लाख रुपयांची तीन वाहने व 23 लाखांचा मद्यसाठा असा एकुण 43 लाख रूळपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यातील मुख्य संशयित मुक्तार अहमद शेख (35, रा. जम्मू काश्मिर), शंकर मंजू गौडा (44, रा. कर्नाटक) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. ही दरोड्याची घटना 9 मे रोजी नाशिक रोडच्या शिंदे गाव परिसरातील लोहिया कपाऊंड येथील राजस्थान लिकर कंपनीच्या गुदामात घडली होती.

9 मे रोजी एका टोळक्याने लोहिया कंपाऊंडमधील गुदामाच्या सुरक्षारक्षकाचे हात पाय बांधून तेथील 26 लाख 94 हजार 203 रुपयांचा मद्यसाठा चोरला होता. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार गुन्हे शाखा एकच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जालना पर्यंत जाऊन मुख्य संशयित मुक्तार शेख यास ताब्यात घेतले.

तर गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने नवी मुंबई, पुणे येथे तपास करुन गुन्ह्यात वापरलेली वाहने, चोरलेला मद्यसाठ्याची विल्हेवाट लावणारा संशयित शंकर गौडा यास ताब्यात घेतले. तसेच मुद्देमाल ताब्यात घेतला. इतर फरार संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलीस आयुक्त दीपक पांडे, उपआयुक्त संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, अजय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक वसंत खतीले, महेश कुलकर्णी, श्रीराम कुलकर्णी, सहायक उपनिरीक्षक शामराव भोसले, रवींद्र बागुल, पोलीस अंमलदार नाझीम पठाण, महेश साळुंके, प्रवीण वाघमारे, राम बर्डे, शंकर काळे, बाळू शेळके, मोतीलाल महाजन, जयंत शिंदे, महेंद्र साळुंके, संतोष माळोदे, परमेश्वर दराडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

शेख पॅरोलवरून फरार

मुक्तार शेख हा जम्मु काश्मिरचा रहिवासी असून सराईत गुन्हेगार आहे. त्याला मुंबईतील एका गुन्ह्यात आठ वर्ष शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबई व नाशिकच्या कारागृहात सहा वर्ष शिक्षा भोगून तो पॅरोलवर बाहेर आला होता. त्यानंतर कारागृहात हजर न होता तो गुन्ह्यांकडे वळला होता. यामुळे तो फरार गुन्हेगारांच्या यादीत पोलीसांना हवा होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com