प्रवाशाला लुटणारे जेरबंद

प्रवाशाला लुटणारे जेरबंद

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

तामिळनाडू येथून आलेल्या एका प्रवाशाला ( traveler from Tamil Nadu ) मारहाण करून त्याच्या जवळील मोबाईल व इतर साहित्य असा सुमारे 30 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटणार्‍या (robbing a passenger) दोघांना नाशिकरोड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.

तिलक तिरूमणी, रा. तामिळनाडू हा प्रवासी दोन दिवसांपूर्वी नाशिकरोड येथे आला होता त्यानंतर तो एका रिक्षात बसला असता रिक्षा चालक व त्याच्या साथीदाराने रिक्षा मुक्तीधाम रस्त्यावर नेली व तिरूमणी यास मारहाण करून लूटमार केली. त्याच्या जवळील मोबाईल, मशिनरी टेस्टिंग कंट्रोल व 500 रुपये रोख असा ऐवज लुटून नेला. दरम्यान या घटनेनंतर तिरूमणी यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

तक्रारदाराने आरोपीचे वर्णन व रिक्षा नंबर दिला होता. यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे व त्यांच्या सहकार्‍यांच्या तीन टीम बनविण्यात आल्या. त्यापैकी एक टीम शालीमार, द्वारका व सीबीएस, दुसरी टीम नाशिकरोड रेल्वे स्टेशन, बिटको चौक, जेलरोड व तिसरी टीम पंचवटी, गोदावरी नदी परिसरात शोध घेत होती.

सदरची रिक्षा देवळाली कॅम्प भगूर परिसरातली असल्याचे समजल्यानंतर पोलिसांचे पथक भगूर परिसरात गेले. तेथील भगवा चौक, पंपिंग स्टेशन या ठिकाणी शोध घेतला असता सदरची रिक्षा पोलिसांना आढळून आली. तसेच रिक्षातील दोन संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांची नावे स्वप्निल देविदास चव्हाण (25), रा. बागुल नगर, विहितगाव, नाशिकरोड व साजिद शाहू शेख (24), रा. भगूर बसस्थानकाजवळ असे असल्याचे आढळले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांच्याकडून लुटमार केलेला मुद्देमाल व रिक्षा असा सुमारे 1 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com