सोनसाखळी ओरबाडणाऱ्या दोघांना अटक

सोनसाखळी ओरबाडणाऱ्या दोघांना अटक

देवळाली कॅम्प । वार्ताहर | Deolali Camp

गळयातून 55 हजार रुपये किमतीची सोनसाखळी (Gold chain) ओरबाडून पळ काढणाऱ्या दोघांना देवळाली कॅम्प पोलिसांनी (Deolali camp police) अटक केली आहे...

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश मधुकर पवार (Satish Madhukar Pawar) (57, रा. सत्यम शिवम सोसाईटी, गोडसे मळा) यांच्या गळ्यातून महंमद हुजेफा जमीर खान (Mohammad Huzaifa Jamir Khan) (19, क्षमा बिल्डिंग, सायन, मुंबई व ताबिश फाय्याज खान (Tabish Fayyaz Khan) (23, रा. साई हॉस्पिटलजवळ, धारावी, मुंबई) यांनी 11 ग्रॅम वजनाची 55 हजार रुपये किमतीची सोनसाखळी बळजबरीने ओरबाडून नेण्याचा प्रयत्न केला.

याबाबत पोलिसांना माहिती मिळताच तातडीने त्यांनी घटनास्थळी धाव घेत या दोघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक एस. एस. पाडवी (S. S. Padvi) करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com