
सिन्नर | वार्ताहर | Sinnar
मुसळगाव औद्योगिक परिसरातील एका मोबाईलच्या दुकानात रेल्वेची अवैध तिकीट बुकिंग (Illegal ticket booking) प्रकरणी रेल्वे पोलिसांनी सिन्नर पोलिसांच्या मदतीने दोघांना अटक (Arrested) केली...
तजेंद्र सिंह (Tajendra Singh) (32 रा. उज्ज्वलनगर, मुसळगाव एमआयडीसी) याचे मुसळगाव येथे गुरूकृपा मोबाईल शॉप आणि इलेक्ट्रॉनिक्स दुकान आहे. तो अवैध तिकीट विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक रवींद्र कुमार, सागर वर्मा यांनी सिन्नर पोलिसांच्या मदतीने तजेंद्रकडे चौकशी केली.
त्याचा मोबाईल तपासला असता त्यांना रेल्वेची तीन तिकिटे मिळून आली. गरजू प्रवाशांकडून प्रत्येकी अडीचशे रुपये जास्त घेऊन सिन्नरमधील (Sinnar) विजय ट्रॅव्हलचा मालक विजय डांगरे (Vijay Dangare) याच्यातर्फे तो तिकीट बुक करत होता.
रेल्वे सुरक्षा दल व पोलिसांनी तजेंद्रकडून एक मोबाईल, पीडीएफ तिकीट जप्त केले. विजय ट्रॅव्हल्समध्ये जाऊन चौकशी केली असता डांगरेने हे आपले जुने आयडी असल्याचे सांगितले. डांगरेचा संगणक तपासला असता, बारा खासगी आयडी आणि 9 हजार 836 रुपयांची तिकिटे, 18 हजार 550 रुपये किंमतीची वापरलेली तिकिटे मिळाली.
त्याचा संगणक, सीपीयू, वही व इतर साहित्य पोलिसांनी जप्त करत नाशिकरोड रेल्वे पोलिसांत गुन्हा (Nashikroad Police Station) दाखल करण्यात आला. मध्य रेल्वेच्या नाशिकरोड रेल्वे सुरक्षा बलाने सिन्नर पोलिसांच्या मदतीने सिन्नरमधील विजय ट्रॅव्हल्सचा संचालक व एजंटला रेल्वे तिकीटाच्या काळाबाजार प्रकरणी ताब्यात घेतले. त्यांना मनमाड न्यायालयात हजर केले असता त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.