
नाशिक | Nashik
येथील म्हसरूळ (Mhasrul) गावात भांडणाबाबत समजावून सांगण्याचा राग आल्याने दोन जणांनी एका युवकाला (Youth) बंदुकीसारख्या हत्याराने डोक्यात मारून खूनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, राजेश देवीदास पवार (वय २३, रा. मांडवे सोसायटी, प्रभातनगर, म्हसरूळ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा भाऊ मनोज पवार याच्यासोबत झालेल्या भांडणाबाबत संशयित रिकेश गणेश सोलंकी (वय २४, रा. बेलदारवाडी, दिंडोरी रोड, म्हसरूळ) व रोहित खंडू गांगुर्डे (वय २३, रा. मंजूबाबा गल्ली, फुलेनगर, पेठ रोड, नाशिक) यांना समजावून सांगत होता.
याचा राग आल्याने रिकेश सोलंकी व रोहित गांगुर्डे यांनी फिर्यादी पवार व त्याच्या भावास शिवीगाळ करून "तुमच्याकडे उद्या बघतो,' असे म्हणून गांगुर्डे याने जर्कीनच्या उजव्या खिशातून बंदुकीसारखे हत्यार काढून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारून दुखापत केली.
दरम्यान, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) दोघांविरुद्ध पवार यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी (Police) दोन्ही आरोपींना अटक (Arrested) केली आहे.