
नाशिक | प्रतिनिधी Nashik
अपघाताचा पहिला प्रकार गोविंदनगर येथे घडला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आमिष हिरालाल कुमार (वय २६, रा. रघुनाथपूर, ता. निजामाबाद, जि. आझमगड) हा सायकलीने इंदिरानगर बोगद्याकडून सर्व्हिस रोडने मुंबई नाक्याकडे जात असताना गोविंदनगर येथील सत्यम् स्वीट्सजवळ त्याला अज्ञात वाहनाने धडक दिली.
त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मावसभाऊ विजय राव याने त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरा प्रकारही मुंबई नाका परिसरात घडला. फिर्यादी अर्चना सचिन कुलकर्णी (रा. सुरभी अपार्टमेंट, आर. टी. ओ. ऑफिसजवळ, मेरी, नाशिक) यांचे पती सचिन श्रीकांत कुलकर्णी हे एमएच १५ जेएफ ३८०९ या क्रमांकाच्या टीव्हीएस ज्युपिटर मोपेडने मुंबई नाक्याकडून जुना मुंबई - आग्रा रोडने घरी येत होते. ते रुची हॉटेलसमोर आले असता समोरून भरधाव आलेल्या मारुती सुझुकी एर्टिगा कारने कुलकर्णी यांच्या मोपेडला जबर धडक दिली.
त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.