डुबेरेत गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

डुबेरेत गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

डुबेरे । वार्ताहर

येथे आज (दि.18) सकाळी दहा वाजता वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सकाळी आई शेतात कामाला गेली होती.

तर बहिण घराबाहेर भांडे घासत असताना विनायक पंढरी कुंदे (20) याने राहत्या घरात छताला लग्नाचा फेटा बांधून गळफास घेतला.

बहिण भांडे घासून घरात गेल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला. आरडाओरड केल्यानंतर तातडीने विनायकला खाली उतरवण्यात आले.

मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. दुपारी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नगरपालिका दवाखान्यात पाठवला.

त्यानंतर शोकाकुल वातावरणात विनायकवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले होते. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com