सॅनिटायझर प्यायल्यानंतर स्वत:वरच केले धारधार शस्राने वार; २० वर्षीय युवतीची आत्महत्या

सॅनिटायझर प्यायल्यानंतर स्वत:वरच केले धारधार शस्राने वार; २० वर्षीय युवतीची आत्महत्या
USER

नाशिकरोड | प्रतिनिधी

सॅनिटायझर प्यायल्यानंतर हाताच्या मनगटावर धारदार शस्त्राने वार करून एका वीस वर्षीय युवतीने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे...

शिवानी लक्ष्मण भुजबळ (रा. आशेवाडी ता. दिंडोरी) असे या युवतीचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, मृत शिवानी नाशिकरोड येथील बिटको हॉस्पिटलमध्ये आपल्या आईला भेटण्यासाठी आली होती.

परंतु, आईचे निधन झाल्याचे समजताच हा धक्का सहन न झाल्याने या युवतीने हॉस्पिटलच्या बाहेर आल्यानंतर सॅनिटायझर पिऊन घेतले.

त्यानंतर धारदार शस्त्राने हाताच्या मनगटावर वार केला. या घटनेनंतर युवतीच्या भावाने तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान या युवतीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार कोकाटे हे करत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com