वीस आरोग्यसेवकांना पदोन्नती

वीस आरोग्यसेवकांना पदोन्नती

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत ( Health Department of Zilla Parishad Nashik )कार्यरत असलेल्या आरोग्यसेवक (पुरुष) संवर्गातून आरोग्य सहाय्यक पुरुष संवर्गात वीस कर्मचार्‍यांना मुख्य कार्यकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते समुपदेशनाने पदोन्नती देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात पदोन्नतीची प्रक्रिया पार पडली. दिव्यांग कर्मचारी, दुर्धर आजाराने ग्रस्त कर्मचार्‍यांना समुपदेशनावेळी प्राधान्य देण्यात आले. त्याचसोबत 274 आरोग्य कर्मचारी यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला असून यापुढेदेखील कर्मचार्‍यांच्या पदोन्नती व सेवानिवृत्तीच्या प्रकरणांचा निपटारा लवकरात लवकर करावा, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आरोग्य विभागास दिले. समुपदेशनाने पदोन्नतीची प्रक्रिया पार पडल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.

या पदोन्नती प्रक्रियेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंदराव पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रशासन अधिकारी रवींद्र आंधळे, बाळू पवार, कनिष्ठ प्रशासन अधिकारी चंद्रशेखर पाटील, संदीप माळी, अनिल गिते, वरिष्ठ सहाय्यक सूर्यकांत मैंद यांनी मेहनत घेतली.

बढतीचे लाभार्थी

प्रदीप कैलास निकम (दिव्यांग), अमज़द अहमद सय्यद, सुनील यशवंत कोकाटे, जगन्नाथ तुळशीराम शिंदे, आरिफ बालन मन्सुरी, तात्यासाहेब चिंधा पवार, मनोज शामराव पाटील, सुनील भाऊराव देवकर, प्रभाकर नागोराव खरात, कैलास दौलत पवार, सीताराम मंगळू भोये, प्रसाद कृष्णराव वाळुंज, निंबा सुपडू सोनवणे, फिरोज रज्जाक मन्सुरी, एकनाथ दामू कुवर, संजय नरेंद्र तांबे, शरद वसंत घरटे, भाऊसाहेब अभिमन शिंदे, दादाजी पंडित गुंजाळ, संतोष आनंदा गिरी.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com