औद्योगिक वसाहतीत चोवीस तास बंदोबस्त

उद्योजकांनी सुरक्षा यंत्रणा सक्षम राखावी : खरात
औद्योगिक वसाहतीत चोवीस तास बंदोबस्त

सातपूर । प्रतिनिधी Satpur

आयामातर्फे AIMA अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीसाठी Satpur & Ambad Industrial Area प्रत्येकी एक वाहन रात्रीच्या गस्तीसाठी पोलिसांना देण्यात येणार असल्यामुळे दिवाळी सुटीत Diwali Festival Holiday's रात्रभर बंदोबस्त असणार आहे, असे पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी सांगितले.

दिवाळीच्या काळात 3 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत औद्योगिक क्षेत्रात सुटी राहत असते. या कालावधीत उद्योगांमध्ये चोर्‍यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आयमाच्या पुढाकाराने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीला पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलीस आयुक्त सोहिल शेख, आयमाचे अध्यक्ष वरून तलवार, सरचिटणीस ललित बुब, आयमा विश्वस्त समिती चेअरमन धनंजय बेळे, आयपीपी राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष निखिल पांचाळ, सुदर्शन डोंगरे, सचिव राजेंद्र पानसरे, अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक कुमार चोधरी, व सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे होते.

आयमाच्या पुढाकाराने दिवाळी सूटीतील बंदोबस्ताचे नियोजन केल्यामुळे गेल्या सात ते आठ वर्षांपासून औद्योगिक वसाहतीमधील चोर्‍यांचे प्रमाण कमी झाले असल्याचे सांगितले. उद्योजकांनी सीसी टीवी कॅमेरे कारखान्याच्या समोर व सभोवतालच्या परिसरात लावल्यास काही घटना घडल्यास तपास करणे सोयीचे होईल असेही वरून तलवार म्हणाले.

याबैठकीत पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीत दिवाळी सुटीत पोलिस बंदोबस्तकरणार असले तरी उद्योजकांनी देखिल सुरक्षेबाबत जागरुकता बाळगणे गरजेचे असल्याचे सांगितले.

औद्योगिक वसाहतीत कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ, नेहमीप्रमाणे भंगार बाजारावर लक्ष केंद्रित करणे, बॅरीकेटींग करणे, नाकेबंदी करणे, वाहन तपासणी करणे, बीट मार्शलची संख्या वाढवणे यासारख्या अनेक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले.

आयामातर्फे अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीसाठी प्रत्येकी एक वाहन रात्रीच्या गस्तीसाठी पोलिसांना देण्यात येणार असल्यामुळे दिवाळी सुटीत रात्रभर बंदोबस्त असणार आहे कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन सरचिटणीस ललित बुब यांनी मानले.

यावेळी एस एस भोगल, जितेंद्र आहेर, प्रमोद वाघ, एन. डी. ठाकरे, आर. एस. नाईकवाडे, एन. टी. गाजरे, अविनाश मराठे, राजेंद्र कोठावदे, गोविन्द झा, प्रकाश ब्राह्मणकर, दिलीप वाघ, जयदीप अलिमचंदानी, जगदीश पाटील, नीलिमा पाटील, विजय जोशी, अविनाश बोडके आदि उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com