देवळाली कॅम्प । Deoalali camp

करोना महामारीत ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करणाऱ्या गावांना विकास कामासाठी अतिरिक्त 25 लाखाचा निधी देण्याची घोषणा करणाऱ्या देवळालीच्या आमदार सरोज आहिरे यांनी रायगडनगर, आंबेबहुला, तिरडशेत या गावांना केलेल्या घोषणे नुसार निधीचे पत्र दिल्याने मतदार संघासह संपूर्ण जिल्ह्यात एक वेगळा पायंडा पडला गेला आहे.

करोना काळात ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर देवळाली मतदारसंघात 25 गावात निवडणूकीचे वारे वाहु लागले,कोरोना काळात प्रशासनावरील कामाचा ताण वाढू नये व स्थानिक वादविवाद टाळण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायती बिन विरोध करण्याचे आवाहन आ. आहिरे यांनी करतांना गाव विकासासाठी अतिरिक्त 25 लाखाचा निधी देण्याची घोषणा केली असता त्यास 3 गावांनी प्रतिसाद दिला.

अर्थसंकलपीय अधिवेशन संपल्यानंतर आ.आहिरे यांनी मतदारसंघात दोरा करताना शिरडशेत, रायगड नगर व आंबे बहुला या तीन गावांच्या ग्रामस्थांनी निवडणूक बिनविरोध केल्याने आमदारांच्या स्थानिक निधीतून अतिरिक्त निधी वर्ग करण्यात येत असल्याचे सांगितले.

आ आहिरेंच्या हस्ते तिरडशेतचे सरपंच अमित बोडके, उपसरपंच शैला वाघ, रायगड नगरच्या सरपंच काळुबाई शिंदे, उपसरपंच संजय लचके व आंबेबहुलाच्या सरपंच सुमन देशमुख, उपसरपंच पांडुरंग गवारी यांना प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांचे पत्र दिले.

यावेळी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जिल्हा कार्यध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, डाॅ. प्रवीण वाघ, पंचायत समितीचे माजी सभापती रत्नाकर चुंबळे,विधानसभा अध्यक्ष , सोमनाथ बोराडे,विक्रम कोठुळे, सुदाम भावले, आदी उपस्थित होते.