त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwer

लॉकडाऊननंतर त्र्यंबकेश्वर मंदिर उघडले असून मंदिरासाठी भक्तांकडून देणग्याचा ओघ वाढत आहे.

आज एका भविकाने 18 किलोची चांदीची पाळ त्र्यंबकेश्वरच्या चरणी अर्पण केली. या पाळची किंमत 12 लाख रुपये असून पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांनी कलात्मक पाळ बनवली आहे.

औरंगाबाद येथील शेखर देसरडा, सुनीता देसरडा व शेखर देसरडा या परिवाराकडून ही पाळ देण्यात आली. त्र्यंबकेश्वर मंदिरात मोठी पिंड असून या पिंडीच्या बाजूला पाळ आहे. त्यावर आवरण म्हणून ही चांदीची पाळ ठेवण्यात येईल.

यावेळी पुरातत्व खात्याचे नाशिकचे अधिकारी सुतारीया व त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त उपस्थित होते. प्रशांत गायधनी यांचे हस्ते देसरडा परिवाराचा सत्कार करण्यात आला.