लासलगाव कृउबात 'ईतक्या' कोटींची उलाढाल

लासलगाव कृउबात 'ईतक्या' कोटींची उलाढाल

लासलगाव। वार्ताहर Lasalgon

करोनाचे सावट दूर झाल्यानंतर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ( Lasalgaon APMC )उलाढालीत लक्षणीय वाढ झाल्याचे आकडेवारी स्पष्ट झाले आहे. या बाजार समितीमध्ये एप्रिल 2021 ते मार्च 2022 या वर्षभरात 1 कोटी 1 लाख 62 हजार क्विंटल कांंदा व इतर शेतमालाची विक्रमी आवक झाली. त्यातून 1695 कोटी 22 लाख 80 हजार रुपयांची उलाढाल झाली आहे.गतवर्षीच्या तुलनेत बाजार समितीच्या उलाढालीत 381 कोटींची वाढ झाली आहे.

85 लाख 34 हजार क्विंटल कांदा आवक झाली. कांंदा विक्रीतून समितीत 1305 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत 366 कोटींनी वाढ झाली आहे. बाजार समितीने अमावस्या आणि शनिवार असे वर्षातील 60 दिवस कामकाज वाढवले आहे, अशी माहिती सभापती सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.

कांदा व इतर शेतमालाचे पैसे त्वरित मिळत असल्यामुळे लासलगाव बाजार समितीत कांदासह धान्य, भाजीपाला, टोमॅटो, डाळिंब आदी शेतमालाचे लिलाव होत आहेत. समितीत कांद्याबरोबर धान्य, भाजीपाला, टोमॅटो, डाळिंब आदी मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने बाजार समितीचे आवार कमी पडू लागले आहे. मका व सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. जीआय मानांकन मिळालेला लासलगावचा कांदा जगातील 74 देशात निर्यात केला जातो. देशाला कांदा निर्यातीतून देखील मोठे परकीय चलन मिळत आहे. एप्रिल 2021 ते फेब्रुवारी 2022 या आर्थिक वर्षात देशाला कांदा निर्यातीतून 2973 कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे.

6 वर्षातील शेतमाल आवक, उलाढाल

2015-16 -40 लाख 76 हजार क्विंटल -532 कोटी

2016-17 -53 लाख 80 हजार क्विंटल-417 कोटी

2017-18 -68 लाख 82 हजार क्विंटल-1098 कोटी

2018-19 -76 लाख 92 हजार क्विंटल -643 कोटी

2020-21 -81 लाख 43 हजार क्विंटल -1314 कोटी

2021-22 -1 कोटी 1 लाख 62 हजार क्विंटल -1695 कोटी

शेतकर्‍यांचा लासलगाव बाजार समितीवर विश्वास असल्याने फळे आणि भाजीपाला नियमनमुक्त असूनही शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात समितीत होत आहे. रोख चुकवती,जलद वजनमाप,पारदर्शक व्यवहार यामुळे शेतकरी लासलगाव बाजार समितीला प्राधान्य देतात. यामुळेच लासलगाव बाजार समितीने सन 21-22 या आर्थिक वर्षात 1695 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे.

- सुवर्णा जगताप, सभापती, लासलगाव बाजार समिती

Related Stories

No stories found.