सराफ बाजारातील ६० कोटींची उलाढाल ठप्प

लाॅकडाऊनचा फटका : कारागिरांची उपासमार
सराफ बाजारातील ६० कोटींची उलाढाल ठप्प

नाशिक । Nashik

सराफा बाजाराला लाॅकडाऊनच‍ा मोठा फटका बसला असून दुकाने बंदमुळे गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होणारी ५० ते ६० कोटीची उलाढालिवर पाणी सोडावे लागले. त्यामुळे सराफा व्यावसायिकांमध्ये मोठी नाराजी होती.

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदिला ग्राहक पसंती देतात. दरवर्षी या मुहूर्ताची ग्राहक वाट पाहत असतात. लग्नकार्य व अन्य शुभ कार्यासाठी गुढी पाडव्याच्या दिवशी सोने चांदीच्या वस्तू व अलंकार खरेदीस पसंती देतात. त्यामाध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होऊन शहराच्या अर्थकारणाला चालना मिळते. गतवर्षी करोना संकटामुळे देशभरात लाॅकडाऊन होत‍ा.

त्यामुळे गुढी पाडव्याच्या मुहूर्त हुकला होता. यंदा तरी दुकाने सुरु राहतील ही अपेक्षा होती. पण करोना संसर्गाने पुन्हा डोकेवर काढल्याने राज्यात लाॅकडाऊन लावण्यात आला आहे. अत्यावश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. त्याचा फटका सराफ‍ा बाजाराला बसला.गुढी पाडवा असूनही पेशवेकालीन परंपरा असलेला सराफा बाजार बंद होता.

या अक्षय मुहूर्तावर होणारी कोट्यवधीची उलाढाल ठप्प होती. दुकाने बंदमुळे सराफा व्यावसायिकांकडे काम करणार्‍या कारागिरांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. करोनामुळे सराफा बाजाराची झळाळी फिकि पडली. प्रतिक्रियासराफा बाजारात छोटि मोठी तिनशे ते चारशे दुकाने आहेत.

दरवर्षी गुढि पाडव्याच्या मुहूर्तावर सोने चांदीचे अलंकार, वस्तू, देवांच्या मुर्ती, रत्नजडित अलंकार याची मोठी खरेदी होत असते. या एका दिवशी ५० ते ६० कोटींची उलाढाल होते. मात्र लाॅकडाऊनमुळे सराफा बाजार बंद होत‍ा. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नूकसान झाले. - चेतन राजापूरकर, माजी अध्यक्ष सराफ बाजार

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com