नांदूरशिंगोटेला गढूळ पाणीपुरवठा

नांदूरशिंगोटेला गढूळ पाणीपुरवठा
पाणी पुरवठा

नांदूरशिंगोटे। वार्ताहर Nandurshingota - Sinnar

येथील पाणी पुरवठा योजनेच्या (Water supply scheme) पाईप लाईनला गळती सुरु असून या पाईप लाईनमध्ये पावसाचे दुषित पाणी मिसळत असल्याने नागरिकांना दुषित पाणी (Contaminated water) पुरवठा होत असल्याचे आण्णाभाऊ साठे फाऊंडेशनचे (Annabhau Sathe Foundation) अध्यक्ष सुरेश कुचेकर सांगितले आहे.

गेल्या काही दिवसांपासून नांदुरशिंगोटे गावात चास रोड नाका येथे गावाला पाणीपुरवठा होत असलेल्या पाईप लाईनला गळती सुरु असून याकडे ग्रामपंचायत प्रशासन कानाडोळा करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गावातून जाणारा चास रोड परिसर गजबजलेला असून या ठिकाणी पाणी गळती (Water leak) होत असल्याने व्यावसायिकांच्या दुकानासमोर हे पाणी साचत आहे. अशात पाणी पुरवठा बंद झाल्यावर पावसाचे दुषित पाणी या पाईपलाईनमध्ये मिसळत असल्याने पुढे हेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी मिळत आहे.

साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना साथीच्या आजाराची लागण होण्याची भितीही व्यक्त करण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून ही पाणी गळती होत असून ग्रामपंचायत प्रशासनाकडून कुठलीही उपाय योजना केली जात नसल्याचे कुचेकर यांनी सांगितले. ग्राम पंचायत प्रशासनाने तत्काळ पाणी गळती थांबवावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.