मुंडे साहेब, तुम्ही नाशिकला परत या! नाशिककरांची ट्विटरवर आर्त हाक

मुंडे साहेब, तुम्ही नाशिकला परत या! नाशिककरांची ट्विटरवर आर्त हाक

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळती होऊन २४ रुग्णांचे जीव गेले. यामुळे शोकमग्न झालेल्या माजी महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी ट्विटरवर भावना व्यक्त केल्या...

यानंतर लगेचच नाशिककरांनी तुकाराम मुंडे यांना साहेब, आज तुम्ही नाशिकला हवा होता. आपण असते तर अशा दुर्घटना झाल्या नसत्या अशा स्वरुपात आर्त हाक दिली.

गेल्या काही वर्षांपूर्वी तुकाराम मुंडे यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली होती. याकाळात अनेकविध उपक्रम राबवून उत्कृष्ट प्रशासकाची छाप त्यांनी पाडली होती. तुकाराम मुंडे यांच्या कामावर नाशिककर कमालीचे खुश होते.

मात्र, बदलीचा कालावधी पूर्ण न करताच त्यांची नाशकातून बदली करण्यात आली होती. त्यांच्या बदलीनंतर अनेक नाशिककर रस्त्यावर उतरले होते. यादरम्यान, या आंदोलकांशी स्वत: मुंडे यांनी चर्चा करत आंदोलन न करता घरी परतावे असे सांगितले होते.

दरम्यान, आज नाशिक महापालिकेच्या डॉ झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या गळतीने ऑक्सिजनवर असलेल्या २४ करोनाबाधित रुग्णांचा दुर्देवी अंत झाला. या घटनेनंतर तुकाराम मुंडे यांनी ही घटना मन हेलावून टाकणारी असून सुन्न झालो असल्याचे ट्विट करत भावना व्यक्त केल्या होत्या.

यानंतर नाशिककरांनी तुकाराम मुंडे हेच नाशिक महापालिकेचे आयुक्त असले पाहिजे होते. ते असते तर दुर्घटना घडली नसती असे म्हटले.

नाशिकसोबतच मुंडे यांनी नागपूरमध्येही जोरदार कामाला प्रारंभ केला होता. त्यांच्या कामाने नागपूरकर समाधानी होते. मात्र, प्रशासन आणि राजकीय हस्तक्षेप यामुळे त्याठिकाणीदेखील कालावधी पूर्ण होण्याच्या आधीच मुंडे यांची बदली झाली होती. या बदलीनंतर अनेक नागपूरकरांनी रोष व्यक्त केला होता.

मुंडे यांच्या ट्विटवर जेव्हा नाशिककर उत्तरले त्याच वेळी अनेक नागपूरकरांनी मुंडे यांना नागपूरला यावे असे सांगितल्याच्या कमेंट्स आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com