साहित्य संमेलन घेण्याबाबत चाचपणी

साहित्य संमेलन घेण्याबाबत चाचपणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन Akhil Bhartiya Marathi Literary Convention नोव्हेंंबरच्या दुसर्‍या अथवा तिसर्‍या आठवड्यात घेण्याबाबत चाचपणी सुरु असून लवकरच त्यावर निर्णय होईल, असे संमेलनाचे स्वगताध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ Guardian Minister Bhujbal यांनी आज येथे स्पष्ट केले.

भुुजबळ म्हणालेे की, साहित्य संंमेलनाची बहुतांंशी तयारी पूर्ण झाली आहे. केवळ करोनामुळे संमेलन स्थगित करावे लागले होते. मात्र आता शाळा, मंदिरे उघडली आहेत. करोनाचा प्रादुर्भाव बर्‍यापैकी कमी झाला आहे. तरी सु ध्दा्नवरात्री नंंतर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यानंंतर राज्य शासनाच्या मान्यतेने तारीख निश्चित केली जाईल. तुर्त तर्री नोव्हेंबर पर्यंंत वातावरण अनुकल व्हावे अशी इच्छा आहे.

दरम्यान येत्या सेामवारी महाविकास आघाडीने शेतकर्‍यांना चिरडल्याच्या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शेतकर्‍या प्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी व सत्ता असली म्हणजे आपण कोणालाही चिरडू शकतो, या अपप्रवृत्तीला विरोध दर्शविण्यासाठी प्रत्येक देशप्रेमी नागरिकाने या बंदमध्ये सहभागी व्हावे. शेतकर्‍यांप्रती आपली सहानुभूती व्यक्त करावी असे आवहन भुजबळ यांंनी यावेळी केले.

Related Stories

No stories found.