वातावरण खराब करण्याचा प्रयत्न: ना. थोरात

वातावरण खराब करण्याचा प्रयत्न: ना. थोरात

संगमनेर । प्रतिनिधी | Sangamner

तालुक्याच्या विकासाची घोडदौड सातत्याने सुरु असून विविध विकास कामांसाठी (development works) मोठा निधी (fund) मिळत आहे. या सर्व प्रगतीच्या वाटचालीमध्ये अनेकांचे योगदान असते.

आपल्या तालुक्यात सहकारी संस्था अत्यंत चांगल्या आहेत आणि हे काही लोकांना पहावत नाही. म्हणून ते स्थानिकांना हाताशी धरुन वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला महसुल मंत्री बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी लगावला.

तालुक्यातील निमोण (Nimon) येथे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून (Water supply scheme) आलेल्या पाण्याचे जलपूज ना. थोरात यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब कुटे, डॉ. जयश्री थोरात, चंद्रकांत घूगे, प्रताप शेळके, बंडुनाना भाबड, अनिल घूगे, दिप्ती सांगळे, दगडु घूगे, सुभाष सांगळे, भारत मुंगसे उपस्थित होते. अनेक अडचणीवर मात करुन अवघड वळणांमधून आज ही पाणी योजना पूर्णत्वास आली आहे.

या योजनेद्वारे निमोण, पळसखेडे, पिंपळे, सोनेवाडी, कर्‍हे या पाच गावांना शाश्वत पिण्याचे पाणी (drinking water) मिळणार आहे. आजचा दिवस हा या पाच गावांसाठी ऐतिहासिक आहे. मीरा चकोर आणि बी. आर. चकोर यांनी योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यातून ही स्वप्नवत योजना साकार झाली आहे. यामुळे प्रत्येक गावातील जलकुंभात पाणी पोहोचणार आहे. पुढील टप्प्यामध्ये वाडी-वस्तीपर्यंत पाणी पोहोचण्याचे काम केले जाईल.

भाजपाने (bjp) कायम कूटनीतिचे राजकारण (politics of diplomacy) केले आहे. मागील पाच वर्षात त्यांनी शिवसेनेला (shiv sena) कायम दुय्यम वागणूक दिली. आता या सरकारसाठी दररोज नवीन नवीन तारखा देत आहेत. भविष्य सांगत आहेत. दिल्लीमध्ये शेतकर्‍यांच्या (farmers) आंदोलनाला (agitation) चिरडणार्‍या भाजपाला कधीही, गोरगरीब व शेतकर्‍यांबद्दल सहानुभुती नाही अशी टीकाही त्यांनी केली.

Related Stories

No stories found.