द्राक्षबागेत पेटल्या शेकोट्या

द्राक्षबागेत पेटल्या शेकोट्या

लासलगाव। वार्ताहर | lasalgaon

उत्तरेकडून येणार्‍या थंड वार्‍यामुळे (Cold weather) निफाडचे (niphad) तापमान (Temperature) दिवसेंदिवस कमी होत असल्याने याचा फटका द्राक्ष उत्पादक (Grape growers) शेतकर्‍यांना (farmers) बसत असून आपली द्राक्ष बाग (Vineyard) वाचवण्यासाठी रात्रीच्या वेळी द्राक्षबागेत धूर व शेकोटी करून द्राक्षबाग वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. वाढत्या थंडीमुळे (cold) द्राक्षांना तडे तसेच द्राक्ष फुगवणीवर याचा परिणाम होत असल्याने द्राक्ष बागांना ऊब निर्माण करण्याकरता द्राक्ष उत्पादक शेतकरी रात्रीच्या वेळी आपल्या द्राक्षबागेत शेकोट्या पेटवत आहेत.

द्राक्ष हे वर्षातून एकदा घेतले जाणारे पीक आहे. शिवाय इतर सर्व पिकांपेक्षा जास्त खर्च होतो. त्यामुळे पीक चांगले यावे आणि आर्थिक फायदा (Financial gain) व्हावा यासाठी शेतकरी मोठी कसरत करत असतात. द्राक्षाची पीक हे ऐन थंडीच्या हंगामात बहरण्यास सुरुवात होते आणि अशात दक्षिणेकडील अरबी समुद्रात (Arabian Sea) तसेच हिंदी महासागरातील (Indian Ocean) चक्रीवादळाचा (Hurricane) जोर असल्याने उत्तरेकडून येणारे थंड वारे (Cold winds) मोठ्या प्रमाणात नाशिक जिल्ह्यात (nashik district) दाखल होत आहे.

याचा थेट परिणाम तालुक्यात सलग पाच-सहा दिवसांपासून थंडीचा कडाका वाढत असून यामुळे द्राक्ष मण्यांना तडे जाणे, वाढ खुंटणे, द्राक्ष कुजणे, द्राक्ष झाडाची मुळे चोकअप होणे, द्राक्ष झाडात साखर उतरण्याची प्रक्रिया पूर्णत: थांबणे आदी समस्यांना शेतकर्‍यांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या द्राक्षाच्या दोन हंगामात करोनाचा प्रादूर्भाव असल्याने द्राक्ष मातीमोल विकावे लागले होते.

यंदा करोनाचा (corona) प्रादूर्भाव कमी असल्यामुळे फायदा होईल अशी अपेक्षा आहे. त्यात थंडीत वाढ झाली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी द्राक्षबागांवर अतिरिक्त औषधांची फवारणी केल्यास सदरची द्राक्षे निर्यातीला नाकारले जाण्याची भीती असते. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्षांना ठिबकद्वारे पाणी देणे तसेच द्राक्षबागेत विशिष्ट अंतरावर रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटवून द्राक्षे घडांसाठी उबदार वातावरण तयार करतांना दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com