नाशिक । Nashik

गोदावरी नदी जी दक्षिण भारतातील एक प्रमुख नदी आहे. तिला दक्षिण गंगा देखील म्हटले जाते. गोदावरी नदीची उत्पत्ती नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून झाली असून तिला मोठे धार्मिक महत्त्व आहे. परंतु खेदाची गोष्ट अशी आहे की, वाढत असलेले जल प्रदूषण गोदावरीची समस्या बनलेले आहे.

खूप साऱ्या कंपन्यांचे केमिकल युक्त खराब पाणी या नदीपात्रात सोडले जाते. ज्यामुळे गोदावरीचे पाणी पिण्या योग्य राहत नाही. आणि त्यामुळे अनेक आजारांची लागण नागरिकांना होत आहे जसे की, त्वचे संबंधी आजार असेल पनिजण्य रोग असेल हे आजार होण्याची भीती देखील असते.

पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचे प्रमाण वाढले असून काही ठिकाणी गोदावरी नदीचे संपूर्ण पात्र पान वेलिनी घेरलेले आहे. खा.डॉ.भारती पवार यांनी संसदेत प्रश्न मांडत असताना दिंडोरी लोकसभा मतदार संघातील निफाड तालुक्यातील नांदुर मध्यमेश्वर येथे पक्षी अभयारण्य आहे.

ज्या ठिकाणी 200 पेक्षा अधिक निरनिराळ्या जातींचे पक्षी येत असतात ज्यामध्ये फ्लेमिंगो, स्पुन बिल्स असेल. त्याच ठिकाणी 25 पेक्षा अधिक माशांची देखील प्रजाती पहावयास मिळते. नांदूर मध्यमेश्वर ला रामसर मध्ये घोषित केले आहे. ह्या अनमोल ठेव्यास सुरक्षित ठेवण्याची अमाची देखील जबाबदारी आहे.

परंतु या देखील क्षेत्रात जल प्रदूषणाचा धोका वाढत आहे. ह्यामुळे खा.डॉ.भारती पवार यांनी संसदेच्या सभापती महोदयांच्या माध्यमातून विनंती केली की, केंद्र आणि राज्य सरकार मार्फत स्वच्छता अभियान राबवून गोदावरी नदीचे प्रदूषण दूर करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचा प्रयत्न करण्यात यावा अशी विनंती करण्यात आली.