रस्ते आणि पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करा

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या सूचना
रस्ते आणि पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पेठ (peth) आणि दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) रस्ते (road) आणि विविध पायाभूत सुविधांचा (Infrastructure) दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक नियोजन करा, अशा सूचना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Deputy Speaker of the Legislative Assembly Narhari Jirwal) दिल्या.

श्री. झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली आज पेठ आणि दिंडोरी तालुक्यातील विविध विकास कामांबाबत आढावा बैठक (Review meeting) विधान भवनात झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

बैठकीस राज्य साखर संघाचे (State Sugar Union) उपाध्यक्ष, कादवा सहकारी साखर कारखान्याचे (Kadva co-operative sugar factories) अध्यक्ष श्रीराम शेटे (Shriram Shetty), जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, उपवनसंरक्षक पंकज धर, दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी संदीप आहेर, उपवनसंरक्षक तुषार चव्हाण आदी उपस्थित होते.

पेठ आणि दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) आरोग्य व्यवस्थेचे (Health system) बळकटीकरण करण्यासाठी प्रयत्न करा. आरोग्य यंत्रणेच्या जीर्ण झालेल्या इमारतींचे निर्लेखन करा. नवीन आरोग्य उपकेंद्राची मागणी येत आहे मात्र याबाबत फेर सर्व्हेक्षण (survey) करा. उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तलाठी आणि सर्कल कार्यालयांचे नूतनीकरण करावे. नूतनीकरण करताना नागरिकांच्या सोयीचा प्राधान्याने विचार करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पेठ आणि दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांची (farmers) ठिबक सिंचनासाठी (Drip irrigation) मागणी असते. त्यामुळे ठिबक सिंचनासाठी जास्तीत जास्त निधीची (fund) तरतूद करा. खतांचा पुरवठा सुरळीत राहील, यांची काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या.

पेठ (peth) आणि दिंडोरी (dindori) तालुक्यातील बहुतांश गावे जंगलात आहेत. या गावांचे पोहोच रस्ते उत्तम दर्जाचे करा. हे रस्ते करण्यासाठी वन विभागाने नियमांचे पालन करुन परवानगी द्यावी. वनसंपदेला धक्का न लावता बंधारे करा. पाण्याचे जास्तीत जास्त स्त्रोत निर्माण करा, अशी सूचना त्यांनी केली.

पेठ येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयासाठी मैदान आणि संरक्षक भिंत करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. यावर श्री. झिरवाळ यांनी या शाळेतील मुलीं क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करु शकतात. त्यांच्यात गुणवत्ता आहे. या शाळेला क्रीडांगण आणि संरक्षक भिंत करण्यासाठी निधी द्यावा, अशा सूचना श्री. झिरवाळ यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कल्याणी धात्रक यांना दिल्या. यावर श्रीमती धात्रक यांनी संबंधित शाळेला टप्पा टप्प्यात निधी देऊ, असे सांगितले.

बैठकीस सार्वजनिक बांधकाम विभागाचे दीपक कशाळकर, बी. एम. गांगुर्डे, कृषी विभागाचे बाळासाहेब शेलार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा नियोजन अधिकारी , जिल्हा समाजकल्याण अधिकारी, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्या बरोबरच लघु पाटबंधारे, जलसंपदा, महावितरण, कृषी आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com