‘ट्रूजेट’ची इंदूरसाठी विमानसेवा

‘ट्रूजेट’ची इंदूरसाठी विमानसेवा

सातपूर । प्रतिनिधी Satpur

ट्रूजेट विमान कंपनीने (Trujet Airlines ) 1 सप्टेंबरपासून इंदूरसाठी हवाईसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नाशिकहून बुधवारी आणि शनिवारी विमानसेवा नसल्याने प्रत्यक्षात गुरुवारपासून (दि.2) नाशिक-इंदूर हवाईसेवा सुरू करण्यात आली (Nashik-Indore air service started ). ही सेवा आठवड्यातून चार दिवस राहणार आहे.

ट्रूजेट कंपनीने मागील वर्षीपासून नाशिक-अहमदाबाद विमानसेवा सुरू केली आहे. ट्रूजेटने नाशिक-अहमदाबाद विमानसेवे सोबतच अहमदाबाद इंदूर या विमान सेवेचाही समावेश केल्याने नाशिक अहमदाबाद इंदूर अशी विमान सेवा सुरू झाली आहे.

कंपनीने एक सप्टेंबरपासून ही सेवा सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार गुरुवारी (दि.2)नाशिक-अहमदाबाद-इंदूर सेवा सुरू झाली आहे. परंतु, सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार अशा पाच दिवस नाशिकहून ट्रूजेटची सेवा आहे. बुधवार असल्याने उड्डाण नव्हते. परिणामी आज, गुरुवारी (दि.2)नाशिकहून अहमदाबादला जाणारे विमान पुढे इंदूरपर्यंत उड्डाण घेणार आहे. नाशिकहून इंदूरसाठीचे तिकीट 3 ते 3500 रुपयांदरम्यान आहे.

नाशिकहून अहमदाबादला जाणार्‍या 72 आसनी विमानांना सध्या 35 ते 40 प्रवासी लाभ घेत आहेत. आता इदूरपर्यंत सेवा वाढविल्याने ही प्रवाशी संख्य 60 ते 70 पर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इंदुर साठीचे ट्रयुजेटचे विमान नाशिकहून सायंकाळी 6.50 वाजता उड्डाण घेऊन अहमदाबादला रात्री 8.05 वाजता पोहचणार आहे. तेथून 8.30 वाजता ते इंदूरसाठी उड्डाण घेणार असून, रात्री 9.40 वाजता इंदूरला पोहोचणार आहे. या विमानातून काल प्रवास केलेल्या इंदूरसाठीच्या प्रवाशांंची संख्या मात्र समजू शकलेली नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com