समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; ट्रक पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळला

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; ट्रक पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळला

वावी | वार्ताहर | Vavi

समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Highway) लोकार्पण झाल्यापासून त्यावर अपघातांची (Accidents) मालिका सुरूच आहे. अशातच आता पुन्हा एकदा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गा दरम्यान अपघात झाल्याची घटना घडली आहे...

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; ट्रक पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळला
'त्या' विधानावरून संजय राऊतांचा पंकजा मुंडेंना सल्ला; म्हणाले...

याबाबत अधिक माहिती अशी की, काल (दि.३१) मध्यरात्रीच्या सुमारास ट्रक (Truck)क्रमांक एम.एच.४८ सी.क्यू. १२८३ सिन्नर तालुक्यातील वावीजवळ (Vavi) आला असता येथील फुलेनगर परिसरात ट्रक चालकाला (Truck Driver) डुलकी लागल्याने अपघात झाल्याचे समजते. हा अपघात इतका भीषण होता की, ट्रक पुलाच्या बाजूस असणारे बॅरिकेट तोडून कठड्यावर जाऊन अडकला. त्यामुळे सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; ट्रक पुलाच्या कठड्यावर जाऊन आदळला
सर्वसामान्यांना मोठा दिलासा; गॅस सिलिंडरच्या दरात मोठी घट, असे आहे नवे दर

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गाच्या टोइंग व्हॅनने (Towing Van) घटनास्थळी पोहचून मदतकार्य केले. तसेच पुढील तपास (investigation) सुरु आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com