टाके घोटीजवळ ट्रकचालकास लुटले; दोघे ताब्यात, एक फरार

टाके घोटीजवळ ट्रकचालकास लुटले; दोघे ताब्यात, एक फरार
देशदूत न्यूज अपडेट

इगतपुरी । प्रतिनिधी

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर इगतपुरी जवळील टाके घोटी शिवारात एका ट्रकचालकाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील मोबाईल व रोकड चोरून नेत लुटमार करण्यात आल्याची घटना घडली...

या घटनेतील तीन संशयितांपैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. एका संशयिताचा इगतपूरी पोलीस कसून शोध घेत आहेत.

वाहनचालक योगेश पाटील रा. कजगाव जि. जळगांव हे आपल्या वाहनाने मुंबई आग्रा महामार्गावर रात्री २ वाजेच्या सुमारास जात असता त्यांना टाके घोटी जवळ ३ अज्ञात तरुणांनी अडवत चाकूचा धाक दाखवत, दमदाटी करून त्यांच्याकडे असलेला १२ हजार ५०० रुपयांचा मोबाईल, ३४०० रूपयांची रोकड चोरून नेली.

याप्रकरणी, इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत इगतपुरी तालुक्यातील सचिन म्हसणे रा. फांगुळगव्हान व हनुमान आरशेंडे रा. बोरटेंभे या संशयितांना अटक करण्यात आली आहे.

अधिक तपास पोलिस निरीक्षक समाधान नागरे व सहायक पोलिस निरीक्षक डी. डी. पाटील करत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com