दत्त मंदिर चौकातील अपघात प्रकरणी ट्रकचालकास अटक

दत्त मंदिर चौकातील अपघात प्रकरणी ट्रकचालकास अटक

नाशिकरोड | प्रतिनिधी Nashikroad

पंधरा दिवसापूर्वी नाशिक-पुणे महामार्गावर ( Nashik-Pune Highway ) असलेल्या येथील दत्त मंदिर चौकात ( Datta Mandir Chowk )हॉटेल सद्गुरू समोर दुचाकी गाडीला अपघात करून पसार झालेल्या ट्रक ड्रायव्हरला ( Truck Driver Arrested )उपनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे .

अटक केलेल्या ड्रायव्हर चे नाव संपत काशिनाथ तापसे ( Sampat Kashinath Tapse- Truck Driver) राहणार विल्होळी ( Vilholi ) असे असून त्याला ट्रक क्रमांक पी एम एच 15 एच एफ 77 07 या नंबरच्या ट्रकसह अटक केली आहे.

या अपघातात विठ्ठल जाधव घुगे व त्याची पत्नी सुनिता घुगे हे दोघेही जागीच ठार झाले होते सदरचा अपघात हा दत्त मंदिर चौकातील हॉटेल सद्गुरू समोर घडला होता.

अपघात केल्यामुळे ट्रक चालकाविरुद्ध संताप व्यक्त केला जात होता सदर ट्रक चालकाला अटक केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे उपनगर पोलीस ठाण्याचे ( Upnagar Police Station ) वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर पोलीस निरीक्षक पंकज भालेराव कर्मचारी बटुळे लोंढे आदींनी ट्रक ड्राइवर चा शोध घेऊन शिताफीने अटक केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com