Nashik : घोरवड घाटात चालत्या ट्रकला आग

Nashik : घोरवड घाटात चालत्या ट्रकला आग

नाशिक | Nashik

सिन्नर-घोटी महामार्गावरील (Sinnar-Ghoti Highway) घोरवड घाटात (Ghorwad Ghat) आज (दि.१०) रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास चालत्या ट्रकला अचानक आग लागल्याने महामार्गावर एकच धावपळ उडाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, ट्रक क्रमांक एमएच ४८ बी.एम. १६७६ घोटीहून सिन्नरच्या दिशेने जात होता. त्यावेळी अचानक ट्रकच्या मागील बाजूस आग (Fire) लागल्याने क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण ट्रक जळून (Burn) खाक झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तात्काळ सिन्नर नगरपरिषदेच्या (Sinnar Municipal Council) अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. यावेळी अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com