कोटंबी घाटात ट्रक-इकोत भीषण अपघात, महानुभाव पंथाचे महंत जखमी

कोटंबी घाटात ट्रक-इकोत भीषण अपघात, महानुभाव पंथाचे महंत जखमी

पेठ | Peth

नाशिक-पेठ मार्गावरील (Nashik-Peth) कोटंबी घाटात (Kotambi Ghat) अपघातांचे सत्र सुरूच आहे. आज सकाळी ट्रक व इको कार अपघातात सात जण (Truck & Eco Car Accident) जखमी झाले आहेत.

दरम्यान नाशिककडून गुजरातकडे जाताना पेठकडून नाशिककडे खत घेऊन जाणारा (एमएच १५ ए एस ९९७८) क्रमांकाचा ट्रक सुसाट वेगाने येऊन इको स्टार क्रमांक (जीजे १५ सीके ०५२८) गाडीस धडक देऊन घाटातील संरक्षक कथड्याची भिंत तोडून दरीत कोसळला. यात महानूभाव पंथाचे महंत मनोहर कपाटे यांच्यासह ७ अनुयायी जखमी (Injured) झाले आहेत.

या अपघातात ट्रकचे मागील टायर फुटल्याने गट्टा फसल्याने पूर्ण ट्रक खड्यात जाण्यापासून वाचला तरीही ट्रकचा पुढचा केबीनचा भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. ट्रकचा क्लिनर बाजूस फेकला गेल्याने बचावला, मात्र ड्रायव्हर गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारासाठी नाशिक (Nashik) येथे नेण्यात आले. तर इको गाडीतील ३ महिला व चार पुरुष किरकोळ जखमी झाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com