धोकादायक वळणावर मालवाहतूक ट्रक उलटला

धोकादायक वळणावर मालवाहतूक ट्रक उलटला

ठाणगाव | वार्ताहर | Thangaon

सुरगाणा तालुक्यातील (Surgana Taluka) ठाणगाव-बेडसे रस्त्यावरील (Thangaon-Bedse road) एका धोकादायक वळणावर मालवाहतूक करणारा ट्रक उलटण्याची (Accident) घटना घडली आहे....

एम.एच. 20.सीटी. 5655 हा माल वाहतूक करणारा ट्रक आश्रम शाळा आंबुपाडा बे. येथे खावटीचे धान्य खाली उतरवून परतत असताना बेडसे-ठाणगाव रस्त्यात एका धोकादायक वळणावर चालकाचा गाडीवरून ताबा सुटला.

त्यामुळे हा ट्रक रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र यात वाहनाचे थोडेफार नुकसान झाले आहे. या ट्रकला एका जेसीबीच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न करण्यात आला.

परंतु त्याला यश आले नाही. नंतर दोन जेसीबी, बेडसे, ठाणगाव येथील नागरिक, एका ट्रक्टरच्या सहाय्याने माल वाहतूक करणारा ट्रक बाहेर काढण्यात आला.

दिवसेंदिवस बाऱ्हे ते आबोडे रस्ता धोकादायक बनला आहे. वाहनांची वर्दळ या रस्त्यावर दिवसरात्र सुरू असते. त्यात पावसाचे दिवस असल्याने रस्त्याची चाळण होऊन खड्ड्यांमुळे व साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने दुचाकी, चारचाकी वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवली जात आहे. या गोष्टीकडे सबंधित प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com