कोटंबी घाटात ट्रकचा विचित्र अपघात; चालकाचा दबून मृत्यू

कोटंबी घाटात ट्रकचा विचित्र अपघात; चालकाचा दबून मृत्यू

पेठ | Peth

नाशिक-पेठ मार्गावरील (Nashik Peth Road) कोटंबी घाटात (Kotambi Ghat) धोकादायक वळणावर ट्रकने कथड्यास धडक दिली. यामुळे ट्रक दरीत कोसळला. या घटनेत चालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक-पेठ मार्गावरील (Nashik Peth Road) कोटंबी घाटात (Kotambi Ghat) गुजरातमधून नाशिककडे जाणाऱ्या पूणे येथील कनकेश्वर ट्रान्सपोर्ट कंपनीचा एम एच. १५ एचडी. ५३३८ क्रमांकाचा ट्रक फरशांनी भरलेला होता. ट्रकने कोटंबी घाटातील धोकादायक वळणावर कथड्यास धडक दिल्यामुळे ट्रक दरीत कोसळला.

ट्रकमधील वजनदार फरश्यांमुळे ट्रकचा चेसीवरील सांगाडा वेगळा होऊन त्यामध्ये वाहन चालक सिध्देश्वर भैरव (Siddheshwar Bhairav) दबले गेले. स्थानिकांनी ट्रक चालकास ओढून बाहेर काढले. मात्र ते मृतावस्थेत आढळून आले. याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात (Peth Police Station) अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.