त्र्यंबक नगरपरिषद उपाध्यक्षपदी त्रिवेणी तुंगार बिनविरोध

त्र्यंबक नगरपरिषद उपाध्यक्षपदी त्रिवेणी तुंगार बिनविरोध

त्र्यंबकेश्वर । Trimbakeshwar

त्र्यंबक नगरपरिषदेच्या (Trimbak Municipal Council) उपनगराध्यक्षपदी (vice president) भाजपच्या (bjp) त्रिवेणी सोमनाथ तुंगार (सोनवणे) (Triveni Somnath Tungar) यांची बिनविरोध निवड झाली आहे...

उपनगराध्यक्ष पदासाठी त्रिवेणी तुंगार याचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड (Unopposed selection) करण्यात आली. तर भाजपच्या दुसऱ्या नगरसेविका (Corporator) शीतल उगले (shital ugale) यांनी या पदासाठी दावा केला होता. मात्र त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांनी अर्ज भरला नाही. यावेळी शीतल उगले यांच्यासह भाजपचे सात नगरसेवक या निवडीप्रसंगी गैरहजर होते. तसेच तुंगार यांची निवड होताच त्यांच्या समर्थकांनी फटाके भोडत आनंद व्यक्त केला.

दरम्यान, यावेळी नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर (Purushottam Lohgaonkar) नगरसेवक कैलास चोथे, शिल्पा रामायाणे,अनिता बागुल, संगीता भांगरे, भारती बदादे, सागर उजे, दीपक लोणारी, विष्णु दोबाडे,समीर पाटणकर, अशोक घागरे, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com