त्र्यंबकेश्वरला योगदिनाची जय्यत तयारी

त्र्यंबकेश्वरला योगदिनाची जय्यत तयारी

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

येत्या मंगळवारी देशभर योगदिन (Yoga day) साजरा होणार आहे. त्यानिमित्त केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Union Minister of State for Home Affairs Nityananda Rai) जिल्हा दौर्‍यावर येत आहेत.

त्यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे योगदिनाचा कार्यक्रम होणार आहे. राय यांचा दौरा निर्विघ्न पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा (District administration system) कामाला लागली आहे. त्याकरता प्रशासनाकडून 14 पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांवर दौरा यशस्वी करण्यासाठी जबाबदार्‍या निश्चित करण्यात आल्या आहेत.

यंदा जागतिक योगदिनानिमित्त (World Yoga Day) देशातील 75 ठिकाणी विशेष योगवर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापैकी एक कार्यक्रम त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात केंद्रीय गृह राज्यमंत्री राय यांच्या उपस्थितीत होणार आहे. जिल्हाधिकारी गंगाथरण डी. (Collector Gangatharan d.) यांनी तयार केलेल्या पथकात अरविंद नरसीकर, अनिल दौडे,

वासंती माळी, प्रशांत पाटील, गणेश मिसाळ, कैलास पवार, संदीप आहेर, रवींद्र परदेशी, परमेश्वर कासुळे, नितीन मुंडावरे, नीलेश श्रींगी, राजेश साळवे, संजय जाधव, विजयानंद शर्मा, शरद घोरपडे, राहुल कोताडे, तेजस चव्हाण, दीपक गिरासे, डॉ. अशोक थोरात, सी. डी. साळुंके, अर्चना पठारे, रणजीत राजपूत, एस. एल. खताळे, दत्तप्रसाद नडे यांचा समावेश आहे.

योग्यदिन कार्यक्रमात पावसाचा व्यत्यय होऊ नये म्हणून भव्य सभामंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्यांची डागडुजी पूर्ण झाली आहे. साईड पट्ट्यांची दुरुस्तीदेखील प्रगतीपथावर आहे. दौर्‍यात कसलीही कमतरता राहू नये म्हणून त्र्यंबकेश्वर नगरपरिषद (Trimbakeshwar Municipal Council), त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट (Trimbakeshwar Devasthan Trust), ग्रामीण पोलीस (rural police), तहसील विभाग (Tehsil Department), सार्वजनिक बांधकाम खाते, वीज मंडळ आदी विभागाचे अधिकारी त्र्यंबकेश्वरमध्ये तळ ठोकून आहेत. त्र्यंबकेश्वर येथील गेल्या अनेक दिवसांपासून दुर्लक्षित असलेला डाक बंगला या शासकीय निवास्थानाची स्वच्छता आणि रंगरंगोटी करण्यात आली आहे.

डिजिटल स्क्रीनची व्यवस्था

पावसाची शक्यता गृहीत धरून त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात भव्य वॉटरप्रूफ सभामंडप टाकण्यात आला आहे. योगदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. त्यामुळे येथे डिजिटल स्क्रीनही बसवण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com